श्रीयुत दिनेश नाडकर्णी

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. स्वतःची श्री समर्थ इलेक्ट्रिकल्स नावाची फर्म. इलेक्ट्रिकल इन्टॉलेशन्सचा व्यवसाय. १९९२ साली परमपूज्य भाऊंच्या संपर्कात येताच फर्म बंद करून अध्यात्म-विज्ञानाला वाहून घेतलं. बाल प्रबोधिनी संस्थेचे गाभा समितीचे प्रमुख सदस्य म्हणून कार्यरत.

श्रीयुत दीपक नेमळेकर

पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर असून अनेक वर्षे यशस्वी उद्योजक म्हणून स्वनिर्मित व्यवसाय विकसित केला. तरुणाईने योग्य दिशेने स्वयं विकास करावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. संस्थेच्या गाभा समितीचे सदस्य म्हणून काम पहातात. कोकण, गोवा येथील विद्यार्थ्यांपर्यंत बाल प्रबोधिनीचे कार्य पोहचवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतात.

मुख्य / मान्यवर समिति...

श्रीयुत गिरीश शेनॉय

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे पदवीधर. संगणक आणि वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा स्वतंत्र व्यवसाय करून निवृत्त झाले. बाल प्रबोधिनी संस्थेच्या गाभा समितीचे सदस्य. आणि संस्थेच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात मोलाचे योगदान. इयत्ता १० वी विद्यार्थ्यांसाठी शिबिरे आयोजित करण्यात मोलाची जबाबदारी घेतात. जर मुलांनी बाल प्रबोधिनी उपक्रम आत्मसात केला तर शिक्षणाची योग्य नजर त्यांना प्राप्त होते आणि ते योग्य वाटचाल करू शकतात हा ठाम विश्वास त्यांना वाटतो.

श्रीमती स्मिता गाडगीळ

डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी. ह्या संस्थेच्या गाभा समिती मध्ये समन्वयक म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी संस्थेच्या निर्मिती पासून सांभाळत आहेत. यांनी राखलेल्या समन्वयामुळे संस्थेतील प्रत्येक स्वयंसेवक, शिक्षक आणि गाभा समिती यांच्या मध्ये सौहार्दाचे नाते टिकून आहे. शिक्षक प्रशिक्षण, इतर कागदपत्रे व्यवहार, शालेय उपक्रम संबंधित कामकाज, शैक्षणिक साहित्य अशा आणि इतर सर्व बाबींचे जतन आणि सुनियोजित पध्दतीने त्यांची हाताळणी हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र आहे.

श्रीमती मंगला कैसरे

‘रतन वालावलकर टेक्निकल हायस्कूल’, खार या शाळेत २५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. शिक्षक उपनिरीक्षक पदावर असताना सेवानिवृत्त झाल्यावर २००९ पासून बाल प्रबोधिनीच्या शिक्षक प्रशिक्षणाची धुरा सांभाळली. बाल प्रबोधिनी मधील शिक्षणविषयक मार्गदर्शक तत्वांमुळे आपल्या शिक्षकी पेशाकडे पहाण्याची नजर अधिक प्रगल्भ झाली असे त्यांना मनापासून वाटते.

श्रीमती शुभांगी पोटफोडे

१९८७ पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. मुलुंड येथील VPMs B R Tol High School या CBSE बोर्ड शाळेतून २५ वर्ष शिक्षणाचे कार्य करून २०२३ मध्ये मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त. २००९ पासून बाल प्रबोधिनी संस्थेचा परिस स्पर्श आणि त्यामुळे स्वतःच्या शिक्षकी पेशाकडे पाहण्याची एक निश्चित आनंदी नजर. ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ झाला. स्वतः २००९ पासून मुलुंड येथे बाल प्रबोधिनीचे वर्ग घेण्यासाठी विविध शाळांमध्ये कार्यरत. संस्थेच्या मध्य (सेंट्रल) मुंबई विभागाच्या प्रमुख म्हणून उपकेंद्रांचे काम पहातात. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतात.

श्रीमती स्मिता बलवल्ली

संख्याशास्त्र विषयात पदवीधर, मानस शास्त्रच्या अभ्यासक, समुपदेशन मध्ये पदवी प्राप्त करून तत्संबंधी कार्य. हे कार्य करत असताना बाल प्रबोधिनीशी संपर्क आला. जर बाल प्रबोधिनी उपक्रमातील शैक्षणिक मूल्ये योग्य वयात मुलांच्या मनात रूजली तर भविष्यात समुपदेशनाची गरजच लागणार नाही हे त्यांच्या अभ्यासूवृत्ती मुळे त्यांना जाणवलं. आज संस्थेच्या पश्चिम (वेस्टर्न) मुंबईतील उपकेंद्रांच्या प्रमुख म्हणून कार्य करतात. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतात.

श्रीमती आम्रपाली नाईक

मुंबई विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदवीधर. त्या नंतर चार्टर्ड अकाउंट मध्ये पदव्युत्तर शिक्षण. चा. अ. म्हणून स्वतंत्र प्रॅक्टिस करतात. २५ वर्षांहून अधिक काळ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या सदस्य आहेत. बाल प्रबोधिनी संस्थेत शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात मोलाचे योगदान. आणि संस्थेच्या अकाऊंटंट म्हणून महत्वाची भूमिका सांभाळतात.

श्रीमती अंजली लुकतुके

समुपदेशनात बी. एस. सी. काही वर्ष अंध विद्यालयात कार्यरत. १२-१३ वर्षांपासून विविध एनजीओ मध्ये व्हालेन्टियर म्हणून काम करतात. बाल प्रबोधिनी, पूणे उपकेंद्र प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळतात. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतात.

श्रीमती सुचेता मराठे

M.Sc. इलेक्ट्रॉनिक्स मुंबई विद्यापीठातून. १९८७-९७ ही दहा वर्षे संगणक शास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून एस. पी काॅलेज, पूणे येथे कार्यरत. त्यानंतर पुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगभर बहुराष्ट्रीय कंपनीत २० वर्षाहून अधिक कार्य. २०१५ पासून बाल प्रबोधिनी साठी कार्याचा आरंभ. आज पुणे उपकेंद्राची जबाबदारी अंजली लुकतुके यांच्या बरोबर सांभाळतात. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, शालेय कामकाज, साहित्य वाटप, स्वयंसेवी शिक्षकांना सहकार्य अशा विविध प्रकारच्या जबाबदा-या हाताळतात. २०२० पासून 'वनवासी कल्याण आश्रम', पुणे येथेही सक्रिय आहेत. शिवाय विद्या वाहिनी या NGO बरोबर दूरस्थ खेड्यात इयत्ता ८, ९ आणि १० इयत्तांच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयाचे मार्गदर्शन करतात.