उपक्रमांतर्गत शाळा

२००९ पासून ५ शिक्षक, इयत्ता ७ वीचे पाच वर्ग, पाच विविध मराठी माध्यम शाळांमध्ये एकूण २५० विद्यार्थी घेऊन बाल प्रबोधिनी संस्थेच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. २०१९ पर्यंत ही संख्या चढती कमान ठेऊन मुंबई, पुणे आणि कोकण अशा तीन विभागातून ७५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. प्रशिक्षित शिक्षक आणि शाळा यांची संख्या शेकडोच्या घरात पोहोचली होती. परंतु २०१९-२० या शैक्षणिक वर्षात आलेल्या कोव्हिडच्या लाटेमुळे काही ठिकाणी कार्यावर परिणाम झाला. केवळ मुंबई, महाराष्ट्र वा भारत एवढ्या पुरता नसून ती लाट विश्वव्यापी ठरली आणि प्रत्येक क्षेत्रात त्या मुळे दूरगामी परिणाम दिसून आले. बाल प्रबोधिनीवर साहजिकच परिणाम झाला. पण ज्या काळात अनेक संस्था बंद करण्यात आल्या त्या प्रतिकूल परिस्थितीतही बाल प्रबोधिनी ठामपणे कार्यरत राहिली. जमेल तेवढ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग आपल्या शिक्षकांनी दिले. आज मितीला पुन्हा एकदा बाल प्रबोधिनीचा आलेख उन्नत होत आहे याचं सर्वांनाच समाधान आहे. पुढेही हा वसा चालू राहिल याची खात्री आहे कारण आपल्या सारख्या व्यक्ती समाजातील विविध क्षेत्रामधून बाल प्रबोधिनी मध्ये येताहेत.

२०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात ‘अध्ययन कौशल्य’ हा उपक्रम चालू असलेल्या शाळा

१. जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी स्कूल, जोगेश्वरी, मुंबई

२. माधावराव भागवत हाय स्कूल, विलेपार्ले पूर्व, मुंबई

३. पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले पूर्व, मुंबई

४. वर्सोवा वेलफेर स्कूल, अंधेरी पश्चिम, मुंबई

५. बांदिवली विद्यामंदिर, अंधेरी पूर्व, मुंबई

६. श्री गोविंद बालमंदिर शिक्षण संस्था, अंधेरी पूर्व, मुंबई

७. विद्या विकास हाय स्कूल,

८. उत्कर्ष मंदिर, मालाड पश्चिम, मुंबई

९. सुनदत्ता हाय स्कूल, ग्रँटरोड, मुंबई

१०. शैलेन्द्र एज्युकेशनल सोसायटी, दहिसर पूर्व, मुंबई

११. मंगूभाई दत्तानी हाय स्कूल, बोरिवली पूर्व, मुंबई

१२. चोगले हाय स्कूल, बोरिवली पूर्व, मुंबई

१३. सरस्वती मंदिर हाय स्कूल, माहीम, मुंबई

१४. अरविंद गणबीर हाय स्कूल, जोगेश्वरी पूर्व, मुंबई

१५. शिशूविहार माध्यमिक विद्यालय, दादर, मुंबई

१६. सनराईज इंग्लिश स्कूल, वरळी, मुंबई

१७. सरस्वती मंदिर हाय स्कूल, माहीम, मुंबई

१८. सावित्रीबाई मुलींची शाळा, साकीनाका, मुंबई

१९. टयूलिप इंग्लिश स्कूल, साकी नाका, मुंबई

२०. शिवाई बालक मंदिर, डोंबिवली पूर्व

२१. गजानन विद्यालय, कल्याण पश्चिम

२२. लक्ष्मीबाई खानोलकर हाय स्कूल, सायन

२३. मुलुंड विद्या मंदिर, मुलुंड

२४. श्री राजा शिवराय प्रतिष्ठान, पौड रोड, पुणे

२५. शारदा विद्यालय, पुणे

२६. प्रगती विद्या मंदिर / अभिमन्यु इंग्लिश माध्यम स्कूल, पुणे

२७. विद्या विकास विद्यालय, पुणे

२८. महेश विद्यालय इंग्लिश मीडियम, पुणे

२९. शिंदे हाय स्कूल, पुणे

३०. मोरे विद्यालय, पुणे

२०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीसाठी शिबिरे आयोजित केलेल्या शाळा

१. माधवराव भागवत हायस्कूल, विलेपार्ल, मुंबई

२. अरविंद गंडबीर हायस्कूल, जोगेश्वरी, मुंबई

३. सौ. नलिनीबाई पुरंदरे हायस्कूल, मुलुंड

४. साने गुरुजी नाईट स्कूल, अंधेरी

५. न्यू इंग्लिश हायस्कूल, चिंचघर खेड

६. समर्थ रात्र शाळा, विलेपार्ले

७. श्री. गौरी दत्त मित्तल विद्यालय, सायन

या सर्व शाळा आणि अजून काही शाळा यांची पुढील २०२५-२०२६ वर्षासाठी शिबिरांची मागणी आपल्याला आतापासूनच मिळालेली आहे.