२००९ पासून शालेय विद्यार्थ्यांची मानसिकता घडविण्यासाठी संस्था कार्यान्वित

भावी पिढी घडवायची आहे

शैक्षणिक विकास
विद्यार्थ्यांना स्वतःचं स्वतः

शिकण्यास उद्युक्त केले जाते

स्वयंसेवी शिक्षक प्रशिक्षण
विद्यार्थी विकास साधण्यासाठी बाल प्रबोधिनीच्या शिक्षकांना स्वयंपूर्ण केले जाते.
व्यक्तिमत्त्व विकास
स्व-विकासातून व्यक्तीमत्वाची घडवणूक साधली जाते.
बालप्रबोधिनी मध्ये आपले    सहर्ष स्वागत

बाल प्रबोधिनी ही 'ना नफा ना तोटा' या तत्वावर चालणारी नोंदणीकृत संस्था पौगंडावस्थेतील मुलांची मानसिकता घडविण्याचे कार्य करते.

या संस्थेच्या उपक्रमाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पध्दतीने विद्यार्थ्यांच्या मनावर शैक्षणिक मूल्य रुजविली जातात.

'खेळा आणि शिका' ह्या पध्दतीने, रंगीत तक्ते, काही प्रतिकृती, बोधप्रद रंजक गोष्टींच्या साहाय्याने मुले स्वतःचं स्वतः शिकायला शिकतात.

सहयोगातून सत्कार्य
विविध संस्थांतील मुलांना शैक्षणिक व व्यक्तीविकास मूल्ये दिली जातात

भावी पिढी घडवायची आहे

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोचून शिक्षण घेण्याची मानसिकता तयार करायची आहे.

उद्दिष्ट
ध्येय

पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करणे आणि किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांचा स्व-विकासातून व्यक्तीमत्व विकास साधणे या दोन कार्यांच्या सहाय्याने भावी तरुण पिढीचे सक्षमीकरण करणे.

संस्थेची वैशिष्ट्ये

आमची संस्था शालेय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी अध्ययन कौशल्ये वृद्धिंगत करते

व्यक्तिमत्त्व विकास

    व्यक्ती विकास आणि शैक्षणिक उपक्रम इयत्ता           १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी

  • हा उपक्रम इयत्ता १० वीच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी दोन दिवसीय शिबीर या स्वरूपात घेतला जातो.

  • उपक्रम विनामूल्य घेतला जातो.

  • बाल प्रबोधिनीचे प्रशिक्षित शिक्षक मार्गदर्शन करतात.

  • साधारणपणे जून ते ऑगस्ट या कालावधीत शिबीर आयोजित केले जाते.

  • विविध प्रयोग, प्रतिकृती, कृतीत्मक सहभाग, डॉक्युमेंटरी, चार्टस, उद्बोधक खेळ या माध्यमातून मार्मिक आणि रंजकता पूर्ण पध्दतीने मार्गदर्शन केले जाते.

  • आजमितीपर्यंत २५० पेक्षा अधिक शाळांतून सुमारे ७५,००० विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे.

  • अधिक माहिती आणि फोटो उपक्रम पेजवर उपलब्ध.

  • नियमित शाळांच्या बरोबरीने दूरस्थ शाळा, रात्र शाळा, आश्रमशाळाअशा विविध शाळांमध्ये हा उपक्रम घेतला जातो.

  • कोण सहभागी होऊ शकतं? ज्यांना विद्यार्थ्यांविषयी काही सकारात्मक करण्याची उर्मी आहे अशा व्यक्तींना या उपक्रमात सहभागी होता येतं. व्यवसायाने शिक्षक असण्याची आवंशकता नाही.

  • घरा नजीकच्या शाळेत आठवड्यातून फक्त ३० मिनिटांची एक तासिका घेऊन विद्यार्थ्यांना प्रबोधन करता येतं.

  • संपूर्ण वर्षात एकूण १५ तासिका शालेय कामकाज व्यत्यय न आणता घेतल्या जातात.

  • या उपक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य, प्रतिकृती, काही महत्वाचे लेखी स्वरूपाचे साहित्य आणि इतर अनेक गोष्टी प्रशिक्षित शिक्षकांना विनामूल्य दिल्या जातात.

  • बाल प्रबोधिनी शिक्षकांकडून संस्थेच्या अपेक्षा - प्रत्येक आठवड्यात शाळेत तासिका घेऊन उपक्रम पूर्ण करणे, साहित्य काळजीपूर्वक वापरणे, शाळेने दिलेली वेळ व दिवस अचूक तऱ्हेने पाळणे.

     बाल प्रबोधिनी प्रशिक्षणाचे स्वरूप:-

  1. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक.

  2. ओळख वर्ग, सुट्टीचे दोन दिवस सकाळी ९ ते ४ प्रशिक्षण, दोन डेमो लेसन , एक सूक्ष्म अवलोकन वर्ग अशा टप्प्यांत प्रशिक्षण घेतले जाते.

  3. प्रशिक्षण संपूर्णपणे नि:शुल्क दिले जाते.

शिक्षक प्रशिक्षण संबंधित
शैक्षणिक विकास
  • २००९ – २०१० या शैक्षणिक वर्षात सुरवात

  • ‘आपल्याला भावी पिढी घडवायची आहे’ हेच उद्दिष्ट

  • मुलांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी ‘अध्ययन कौशल्य’ हा अभ्यासक्रम सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला जातो

  • विविध प्रयोग, प्रतिकृती, कृतीत्मक सहभाग, चार्टस, उद्बोधक खेळ या माध्यमातून मार्मिक आणि रंजकता पूर्ण पध्दतीने मार्गदर्शन केले जाते.

  • श्रीयुत चंद्रकांत ठाकूरदास यांनी ‘मन’ या विषयावर ३६ वर्षे संशोधन केलं. त्यामुळे मुलांच्या मनापर्यंत पोहोचून त्यांना आपलंसं कसं करून घ्यावं याचं त्यांनी मार्गदर्शन केलं

  • हे कौशल्य विकसित करण्यासाठी ‘बाल प्रबोधिनी’च्या स्वयंसेवी शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं, जे हा उपक्रम शाळांमधून राबवितात

  • परिणामी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होऊन त्यांनी स्वतःच स्वतःचा अभ्यास करावा याचं मार्गदर्शन प्रभावी ठरतं

  • पहिल्या वर्षी ५ स्वयंसेवी शिक्षक आणि मराठी माध्यमातील ५ शाळा, २५० विद्यार्थी

  • आजमितीपर्यंत अनेक शिक्षकांमार्फत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून अनेक शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  • कोणत्याही शालेय विषय शिकविला जात नाही

  • राज्य, केंद्र, IB, ICSE किंवा CBSE वा इतर कोणत्याही बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पूरक

  • शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अभ्यासक्रमाची वाखाणणी

सहयोगातून सत्कर्म
  • सेवा सहयोग संस्थेशी संयोगात्मक कार्य

       1) इयत्ता ६/७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम

       2) इयत्ता ९/१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबीर

       3) उत्तम समाज बांधणीच्या हेतूने किशोरांसाठी विशेष मार्गदर्शन

  • बी. एड. महाविद्यालय, आयरोली, नवी मुंबई येथील भावी शिक्षकांसाठी मार्गदर्शन

  • नवी मुंबई येथील सुजया फाऊंडेशन या संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  • वनवासी कल्याण आश्रम

  • देवडी व कोंढणपूर

  • बालगोपालन

आमची वाटचाल

काही क्षणचित्रे